तुला पाहता
तुला पाहता
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
आमुचेच अता ना, राहिलो हे आम्ही..
आमुचेच अता ना, राहिलो हे आम्ही..
होऊन तुझेच बस, राहिलो हे आम्ही.
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
मंद वारा हा जणू येण्याची तुझ्या खबर...
आणि उत्कंठतेने आस ही लाविली त्यात आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
तुझ्या एकाच अशा स्मितानंदाला
जिंदगीच समजून बसलो आहोत आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
अहाहा.. काय तुझ्या त्या अदा..
जसे 'मजनूच'बनून राहिलो हे आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
आठवणी सदा बहरतात या अता..
उघड्या डोळ्यांनीच निद्रिस्त आहोत आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
ज्योती सम तुला तेवती ही पाहून..
बनून पतंग अता राहिलो आहोत आम्ही...
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
झुकलेली पाहून नजर तुझी ही..
होकारच हा समजून बैसलो आहोत आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो कायआम्ही
इशाऱ्यात कसे लपले असते हो प्रेम..
समजून चुकलो अता हे ही ना आम्ही...
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
कुठे हा दिवस अन् कुठे ती ही रात्र..
सगळेच जसे भुललो आहोत आम्ही..
सगळेच जसे भुललो आहोत आम्ही..
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
तुला पाहता, हाय, जाहलो काय आम्ही
