STORYMIRROR

Sushil Deshpande

Others

3  

Sushil Deshpande

Others

पालवी

पालवी

1 min
11.9K

पालवी तरूची आस पुनर्जीवनाची

गेले ते विसरायची निसर्गाला मानायची.. 

ऋतूंशी संबंधांची साथ अवलंबनाची

पालवी ही तरूची पुन्हा बहरण्याची..

 

पालवी आशेची नवीन उत्साहाची

उमेद न हारण्याची पुढे चालत राहण्याची..

कधी फक्त स्वतःची तर बरेचदा दुसर्‍यांची..

पालवी ही आशेची.. वाट नवजीवनाची..

 

पालवी मनाची जणू तरतरीची..

खंबीर राहण्याची घट्ट पाय रोवायची

धीरोदत्त होण्याची  दोन हात करण्याची 

पालवी ही मनाची सामना जीवनाशी लढण्याची ..

 

पालवी प्रेमाची सुंदर अशा स्वप्नांची

दोन उमलत्या जिवांची सदा गुफुंन राहण्याची..

बिनधास्त प्रणयाची पर्वा कशाला कोणाची...

पालवी ही प्रेमाची नशेत प्रेमाच्या डुंबायची...

 

पालवी ममतेची अमोल अशा नात्यांची...

चाहूल आई होण्याची जीव ओवाळून टाकायची...

बाबाच्या निस्वार्थ जिव्हाळ्याची जवाबदारी पेलण्याची..

पालवी ही ममतेची  खरे संस्कार करण्याची...

 

पालवी भक्तीची निस्सीम विश्वासाची

देवी देवता संतांची श्रद्धा आणि सबुरीची...

उपासना शक्तीची  निर्मळ ध्यानधारणेची..

पालवी ही भक्तीची... भवसागरात तरंगण्याची...

 

पालवी ही जीवनाची


Rate this content
Log in