STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

4  

vaishali vartak

Romance Others

कल्पना पूर्ती

कल्पना पूर्ती

1 min
416

आला आला पाऊस आला

निळे अथांग चोहीकडे पाणी 

वर्षा धारेची वरून बरसात

चल सखे गाऊया प्रीत गाणी


झेलू थेंब पावसाचे मिळूनी

करुया नौका विहार मजेत

लुटूया आनंद पहिल्या पावसाचा

किती मजेचे क्षण आलेत


 लाल नौका लाल छत्री 

फुल नावेत फुललेले सुंदर 

दोघे आपण उभे नावेत

जन बघतात दृश्य मनोहर


आला बघ तो दिसे पैलतीर

थांबेल आता तो पाऊस

कागदाचीच ती होती नौका

कल्पनेतील पूर्ण झाली हौस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance