STORYMIRROR

Mangesh Medhi

Abstract Drama Classics

3  

Mangesh Medhi

Abstract Drama Classics

कळलेच नाही

कळलेच नाही

1 min
30

असले तरी मला कधी कळलेच नाही

कळले तरी मला कधी समजलेच नाही


लावीलास जीव प्रेमाने तु अनेकदा

पण मला ते आधी उमगलेच नाही


उमगले मला हे जेंव्हा थोडे थोडे तरी

मन माझे व्यक्त कधी होऊ शकलेच नाही


प्रेमाने हात पुढे केलास जरी तु

हात हाती घेणे कधी सुचलेच नाही


भेटले तु नव्या रुपात पुन्हा पुन्हा

पण मी तुला कधी ओळखलेच नाही


तुझी चुक नाही तु भरभरुन दिले होते

प्रेमा तुझा, स्वीकार करणे कधी जमलेच नाही


आता कविताच माझी सखी प्रेयसी

तीज वीण हे जगणे कधी जगणेच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract