STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

3  

Archana Murugkar

Abstract

कळी उमले

कळी उमले

1 min
295

गुलाबी रंगात

नजर खिळली

हिरव्या अंगणी

कळी जोजावली


सुंदर सकाळ

नाजूक चाहूल

बेधुंद गारवा

उमलले फूल


गंध उमलत

फुलली पाकळी

बंद कूपीतून 

अत्तर उधळी 


मनाच्या डोहात

अनंत तरंग

सुखद स्पर्शाने

खुलतात रंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract