STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Romance

4  

अमोल धों सुर्यवंशी

Romance

खुले मन.....

खुले मन.....

1 min
220

सांगावी ती पहिली भेट.

स्व:ताची पॅन्ट आणि मित्राचा बेल्ट. 

कट्यावरचे बोल...

 तिला येऊन करू दे वेट.

हावऱ्या सारा जाऊ नको तू जायचं लेट 

हे खा ते घे म्हणून बनू नको मोटा शेठ.

सगळं डोक्याच्या वरून, 

माझासाठी ती आणि तीच ग्रेट.

सांगावी ती पहिली भेट... 

भेटीची खूप, अतिघाई.. 

क्षणा,क्षणाला मनात भीतीचा, 

मोठा समुद्र उभा राही. 

आनंदाने मन हरपल होतं.

काय करू आणि काय नाही.

मनात काय चालू आहे हे समजतचं नव्हतं.

ती भेटनार खूप काही बोलणार 

वेड्या कल्पनेने  झोप काय लागेना....

सकाळ होईल म्हणून रात्र काय सरेना

घड्याळच्या काट्याना हाताने फिरवावे. 

चंद्राला बुडवून सूर्याला बोलवावे.. 

चांदण्याना ओंजळीत घेऊन तिला भेटायला जावे.. 

सांगावी ती पहिली भेट.

स्व:ताची पॅन्ट आणि मित्राचा बेल्ट. 

कट्यावरचे बोल,

तिला येऊन करू दे वेट.

हावऱ्या सारा जाऊ नको तू जायचं लेट 

सगळं डोक्याच्या वरून, 

माझासाठी ती आणि तीच ग्रेट...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance