खरंच झाडं बोलायला हवीत
खरंच झाडं बोलायला हवीत
अनंतकाळ खोलवर दडपून ठेवलेली
असंख्य दु:खं आता असहय वेदना देत असताना
मौनतेचं वत सोडून ...झाडं बोलायला हवीत...
पूर्वी आपल्याच अंगा¹खांदयावर किलबिलाट
करणारी पाखरं ,आज झाडं निष्पर्ण होत असताना
निघून जात आहेत तेव्हा डोळ्यांत दाटलेले अश्रू
न लपवता झाडं बोलायला हवीत...
आपल्याच सावलीत कुण्या थकलेल्याला
विसावा देउनही आपल्यावरच जेव्हा कु¹हाड
चालवली जाते तेव्हा खरंच
झाडं बोलायला हवीत...
नाहीतर अखंडितपणे चालूच राहील कु¹हाड
आपल्याच फांदीपासून बनलेली आपल्यावरच
तेव्हा खरंच झाडं बोलायला हवीत...
