STORYMIRROR

AJAY SHELAR

Romance

3  

AJAY SHELAR

Romance

पाऊस नाव घेऊन ...तो नुसताच बरसतोय

पाऊस नाव घेऊन ...तो नुसताच बरसतोय

1 min
4

तो नुसताच तडतडत असतो छपरांवर

तर कधी अगदी मुसमुसत असतो

 पागोळयांतून संथ निथळधार

कसले कसले संदर्भ घेउन ,

बरसत असतो सैरभैर माळरानावर ...

धावत असतो झपाटल्यासारखा, डांबरी रस्यांवर

उनाड वा-यासोबत धुवाँधार

काही देऊन काही घेऊन

सरकत असतो मना-मनांतून

रिमझिमत तिच्या दारावर …

'पाऊस’ नाव घेउन' ‘तो’

कधीपासून , ओल्या आठवणी घेऊन

‘तो’ नुसताच बरसतोय

‘तो’ नुसताच बरसतोय ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance