खळखळ वाहती झरे"
खळखळ वाहती झरे"
हा जन्म रोज जगण्यासाठी
काळोखाच्या दारी फिरूनी
मनी प्रेमाचे गीत भरूनी
गाण्या लैला मजनूची गाणी..
तरूणाईच्या वळणावरती
किती स्वप्नांचे बनवती घरे
उल्हासाने भरूनी खजाणे
नवतराचे खळखळ वाहती झरे..
चंचल जलधारा तरूणाईच्या
काळजात पहाडे साकारती
प्रेमाचे स्वप्न साकार करण्या
विवंचनेतही हसती बहरती..
पंख दिले हे उडण्यासाठी
घेऊ भरारी उंच प्रेमासाठी
खुडत असती मध्येच कुणी
मागे कधीना वळती प्रितीसाठी...

