खळी
खळी
दोन पाकळ्या सखे
नयनांच्या
उमलून तु पाहशील का ?
पानावलेल्या कमल
नयनांनी
खुदकन गाली हसशील
का ?
नकोस ढाळू अश्रुधारा तू
गोऱ्या गालावर उमटे लाली
नकोस फुगवू गाल सखे तू
हरवूण जाईल गोल खळी
वेड लाविले याच खळीने
कसे तूज मी सांगू आज
हरवूण गेलो याचखळीने
सांगू कसा मी येते लाज
विसरून जा हा राग सोनुले
रुसवा मनी तू धरू नको
तुझ्या फसव्याने होईल वेडा
रूसवा मज तू धरू नको.

