राज्य भाषा आपली मराठी
राज्य भाषा आपली मराठी
1 min
201
अक्षराने इतिहास घडवला
किर्तनातून प्रभाव मांडला
मराठीचा गोडवा लागला
इंग्रजीचा हट्ट कशाला
सुजाण नागरिक घडावा
मातृभाषेचा अभिमान असावा
परकेपणा कमी दिसावा
राजभाषेचा दर्जा मिळावा
नका करू संस्कृतीचा दुरावा
मराठी भाषेचे महत्त्व माना
जपा संतांचा ठेवा
महाराष्ट्राची शान जाना
बालक मातृभाषेशिवाय
कसा घडावा
एक - एक शब्द
अनमोल वाटावा
महाराष्ट्राला राजभाषेचा
गौरव मिळावा
सांस्कृतिक परंपरेचा
अभिमान जपावा
---------------------------------
