पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
191
नजरेत माझ्या भिडला
नयनात माझ्या रूजला
मला बघुन सहज तो गहिवरला
माझ्या अंगावर अचानक कोसळला
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला
हळूच स्पर्श त्याला झाला
दवबिंदुने त्याच्या अंगावर शहारा झाला
भेटण्याची इच्छा नसताना
मनाला स्पर्श करून बसला
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला
कोमल ते माझे अंग
झाले ओले चिंब
मातीचा सुगंध सुटला
मानवास मो ईश्वररुपात भेटला
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला
चाहूल लागली चातकाला
कुहू कुहू करत पावशा आला
गारगार झुळकेले भिनाला
धरती वरती जणु स्वर्ग अवतरला
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला ==========
