STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

4  

Prashant Shinde

Romance

खिल्ली...!

खिल्ली...!

1 min
540

खिल्ली उडवून दिल्ली गाठता येत नाही

टर उडवून सर गाठता येत नाही

चुका दाखवून बरोबरी करता येते नाही

पेरल्या शिवाय शिवारात पण उगवत नाही..


टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण मिळत नाही

तव्यावर भाकरी टाकल्या शिवाय पोटात जात नाही

काही दिल्या शिवाय काही घेता येत नाही

आपण सुधारल्या शिवाय देश काही सुधारत नाही


स्वतःहून स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय

घर काही सुधारता येत नाही

घर सुधारल्या शिवाय गल्ली गाव सुधारता येत नाही

गल्ली गाव सुधारल्या शिवाय दिल्ली गाठता येत नाही


स्वतःस बदला घर बदलेल

घर गल्ली बदला गाव बदलेल

गाव बदला देश बदलेल

मग बघा हवं हवं ते निश्चित घडेल...


रणरणत्या उन्हात सुद्धा शीतल चांदण पडेल

शिवारात ही हिरवंगार पीक डोलेलं

पाणी जिरवा पाणी वाचवा पाणीही मुबलक मिळेल

सुजलाम सुफलाम भारत पुन्हा दिसेल,पुन्हा दिसेल...


खिल्ली ची दिल्ली करू नका

खिल्लीला खिल्लीच राहू द्या

प्रत्येक यशस्वी माणसाचं कार्य इतकं सोपं नसत

दिल्लीची खिल्ली उडवण्या इतकं ते छोटं नसत


खर सांगू अस काहीतरी लिहावं वाटलं

कारण जिभेने टाळ्याचं दर्शन घेतलं

आणि चटकन प्रकाश पडला डोक्यात

खरच तस काहीच नसत मनात ...!


आपण विचार करतो

विचारांचे मांडलिक होतो

आपणच आपले 

गुलाम होतो "इतकंच."..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance