Rama Khatavkar

Abstract Others


3  

Rama Khatavkar

Abstract Others


खिडकीतून

खिडकीतून

1 min 237 1 min 237

तो बोलत नाही.

विचारलं, तरी काही सांगत नाही.

या दुनियेतला आहे, 

असं वाटतंच नाही.

त्याच्या वागण्यावरून तर

काही समजतच नाही.

मनाची दारं, 

आतून घट्ट लावून घेतलेली.

मग मी खिडकीतून आत उतरायचं ठरवलं.

एकामागून एक

त्याच्या कविता वाचत गेले.

तेव्हा मग कवी

तळहातावरच्या स्फटिकासारखा

सगळ्या बाजूंनी लख्ख समजायला लागला.

अगदी आतल्या गाभ्यासकट…


Rate this content
Log in

More marathi poem from Rama Khatavkar

Similar marathi poem from Abstract