कधी येशील साजणा
कधी येशील साजणा
आले सागर किनारी
सख्या तुला भेटण्यास |
सांजवेळ आतुरली
दोन मने जोड़ण्यास ||१||
कधी येशील साजणा
वाट पाहते बसून |
साडी तुझ्या आवडीची
आली आहे मी नेसून ||२||
कशी दिसते शोभून
रंग लाल मजवरी |
तुझ्या भेटीसाठी आता
झाली आहे मी बावरी ||३||
खुले करून कुंतल
नभी पाहे निरखून |
मनी करते विचार
कधी येशील दुरून ||४||
तुला मिठी मारण्यास
झाले कासावीस मन |
इथे मला बसण्यास
खडकाचे हे आसन ||५||
स्पर्श लाटांचा पायाला
ये ई भावना मनात |
नक्की येईल साजणा
बोले पवन कानात ||६||