STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Classics

2  

Shrikant Kumbhar

Classics

कधी वाटलं...

कधी वाटलं...

1 min
291

कधी वाटलं...

तुला सर्व काही सांगावं,

तुझ्या प्रत्येक शब्दाने,

तुझ्या मनात बघावं...


कधी वाटलं...

तुला सर्वस्व अर्पावं,

पण, तुझ्या मनाची कलमा,

या वेड्या मनाला कोण सांगावं...


कधी वाटलं...

आजन्म तुझ्याशी बोलत रहावं,

पण, तुझी मुकभाषेची भूमिका,

या वेड्या ओठांना कुणी सांगावं...


कधी वाटलं...

तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत राहावं,

पण, कठोरपणाची ती तुझी भूमिका,

अतुरलेल्या कानांना कुणी सांगावं...


कधी वाटलं...

सर्व रिती - रिवाज झुगारून द्यावे,

पण, फक्त तुझ्या वागण्यानं वाटल,

आहे तसं जीवन काढावं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics