Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

कधी नाही गझल

कधी नाही गझल

1 min
153


पत्र मी फाडले कधी नाही 

मी तुला टाळले कधी नाही 


खूप आवाज मी दिले होते 

तू मला ऐकले कधी नाही 


पुस्तके वाचलीस तू मोठी 

तू मला चाळले कधी नाही 


बाग मी लावली फुलांसाठी 

फूल मी तोडले कधी नाही 


घाव झालेत स्वाभिमानावर

हात मी जोडले कधी नाही 


कोवळे स्वप्न जाळले माझे 

युद्ध मी छेडले कधी नाही 


वादळे नांदली घरी माझ्या 

ध्यान मी मोडले कधी नाही 


सारखी भुंकली मला कुत्री

दगड मी उचलले कधी नाही


Rate this content
Log in