कान्होबा सांभाळी आपुली
कान्होबा सांभाळी आपुली
कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥
तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥
तुझीं गोधनें बा अचाट । धांवती देखोनी विषय हिरवट ॥३॥
तूं बैसोनी करिसी काला । आमुच्या शिदोर्या करुनी गोळा ॥४॥
खातोसी दहीं भाताचा गोळा । आम्हाकदे न पहासी उचलोनी डोळा ॥५॥
वेधिलें आमुचे जीवपण । ठकविलें आम्हाकारण ॥६॥
एका जनार्दनीं परमानंद । आम्ही भुललों तुज गोविंदा ॥७॥
