काळजाचा फोडं
काळजाचा फोडं
तिच्या काळजाचा फोडं
जपे जीवाच्या पल्याडं
सरे ममता जराशी
झाली जीवाला उदारं
माय..... जीवाला उदारं
झाली जीवाला उदारं
तिच्या जीवनाचा अंत
बाळा झाली बघ शांत
येते काळीज भरून
उरे जन्माला पुरून
माय काळजाचा ठोका
कसा चुकवीला मोका
तुला मानलं जीवन
झाली माय ती पावन
माझं जळत काळीज
करपते ही लेखणी
काय रडावे रे जिवा
माय जिंगीचा ठेवा
माय जीवाला उदारं
माय गेली बघ दूर
माझ्या काळजात आगं
कोण तुझ्या पुढं मागं
तुझा ढळताचं तोलं
तुला कोण रं सावरी
स्वामी तिन्ही जगा मंदी
माय विना हो भिकारी
तुझी श्रीमंती सानुल्या
तुला माऊलीने दिली
दिला प्रसंगला जीव
तुझी जिंदगी वाचली
माय.. अंतरीचा टाहो
माय हुंदका मनाचा
माय तुगं सानुल्याला
दीट लावला जीवाचा
तुझे उपकार झाले
झाले जीवन पावन
आल्या जिंदगीत झाले
माय तुझे गं दर्शन
माय.. उसवला धागा
कुठे शिवू सांग जगा
गेली आभाळ देऊन
गेली पोरंक करून
मानू आनंद की दुःखं
किती करपलं सुखं
माझं काळीज तुटलं
कसं दैव हे विटलं
तुझ्या हातातून माय
बोटं.. बाळाचं सुटलं
माय.. जीवाचा जिव्हाळा
माय.. सुखाचा उमाळा
