ऋतू हिरवा
ऋतू हिरवा
मोहर मोहर फुलली अंगी...
हिरव्या रंगा रंगले रंगी...
हिरवा उत्सव, हिरव्या नावे..
हिरव्या वास्त्या हिरवी गावे...
हिरवी गोपी हिरव्या गाणी...
हिरवी रोपे उगती अंगणी..
चंचलं हिरवी... मखमल हिरवी...
हिरवी झाडे... वेल ही हिरवी...
हिरवळ कोवळी... हिरवळ सावळी...
हिरवळ शोभे...नवी नवाळी...
पाने, फुले ही रंगीत सगळी...
*ऋतू हिरवा* ही मौज निराळी...
कोमल कलिका बहरे सुंदर...
जल- जल बारसे...निश्चिल निर्मळ..
पहा सोहळे नित्य ऋ्तूंचे...
हिरव्या परी ना मोह कशाचे...
आनंदी-धन , मोहवी मन हे..
नाचे मयूर अन् बारसे घन हे...
जिकडे -तिकडे सुगंध पेरीत...
*ऋतू हिरवा* बरसे मन मोहित...
प्रेम तरुंचे विभोर गुंजन...
सजणी संगे नाचे साजन...
थुई -थुई.. रूम -झुम...नटखट गुंजन...
गुंजे हरदम, हिरवा सावन....
गुंजे हरदम.. हिरवा सावन...
बारसे हरदम तो मनभावन....
