STORYMIRROR

veena randive

Abstract

3  

veena randive

Abstract

कालचक्र

कालचक्र

1 min
254

अतर्क्य, अकल्पित घटनांची

साक्ष ठरतो आहे

मात करून आव्हान पेलण्याचे

सामर्थ्य देतो आहे..... 


हीच वेळ हेच क्षण आजन्म 

लक्षात ठेवून आहे 

काळाच्या या गतीचे 

आकलन तुला होते आहे....


युगानूयुगे या परिमाणांची

आवर्तने मोजतो आहे 

गतीच्या चक्रात तुझ्या अस्तित्वाचे

श्वास दडले आहे.... 


माझे माझे असे काहीच तुझे

प्रवाहाला घेणे नाही

एकरूप होतं युगांतर पेलणे

कसोटीचे आव्हान आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract