श्रावण
श्रावण
1 min
109
हिरवा साज लेवूनी
धरेस चढली लाली
सखी श्रावणवेडी
ओल्या दवात न्हाली...
श्रावणसुख आनंदाचे
उधळीत सरीवर सरी
लयलूट निसर्गाची
उत्सव घरोघरी...
ओघळती पानोपानी
मन चिंबचिंब होई
रवि दर्शन होता
इंद्रधनू हासत येई...
रुपेरी कडा साजरी
ओल्या शृंगार माला
हर्ष मनी घेऊनी
आला श्रावण आला....
