STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

1  

SANJAY SALVI

Romance

काही आहे बोलायचे

काही आहे बोलायचे

1 min
261

काही आहे बोलायचे

काही तरी सांगायचे,

जुळविता शब्द शब्द

डोळी तुझ्या पहायचे,

अंतरीचे गुज माझ्या

तुला आहे कळवायचे,

 

काही आहे बोलायचे

काही तरी सांगायचे,

हृदयातील गुढ माझ्या

तुला जाणून द्यायचे

डोळ्यातील  स्वप्न आहे

तुला आज दावायचे,

 

काही आहे बोलायचे 

काही तरी सांगायचे,

थरथरत्या हातांनी

हाती हात धरायचे,

बघ न गडे माझ्याकडे

निमूट नाही रहायचे,

 

काही आहे बोलायचे

काही तरी सांगायचे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance