जर नसतील मुली.
जर नसतील मुली.
उमलण्या आधीच कळी l
नका ना तोडू तुम्ही ll
जन्माआधीच मुलीला l
नका मारू कुणी ll १ll
मी जर नसेल तर l
काय असेल भविष्य ll
पांचालीच्या पांडवांसमान l
होऊन जाईल आयुष्य ll २ll
येतील फक्त मुलेच जन्मा l
मुली कुठेच दिसणार नाहीत ll
निसर्गाचा जर नियम मोडला l
तर आया बहिणीच उरणार नाहीत ll ३ll
जर नसतील कुठेच मुली l
सासर माहेर ही नसेल ll
सणांची रे रेलचेल l
फक्त पुस्तकांत आता दिसेल ll ४ll
माय लेकीच्या भेटीचा l
सोहळा दिसणार नाही ll
राखी बांधायला हाती l
कुणाला बहीण उरणार नाही ll ५ll
चेहरा सुनेचा कधीच l
यापुढे दिसणार नाही ll
नातवांसोबत खेळण्याचा आनंद l
म्हातार्यांना मिळणार नाही ll ६ll
आहे गरज काळाची l
मुलगी येऊ द्या जन्मा ll
सारी नाती गोती तीच तर l
जन्मा घालते रे पुन्हाll ७ll
