STORYMIRROR

Rupail Patil

Others

4  

Rupail Patil

Others

कवितेचे शीर्षक:-

कवितेचे शीर्षक:-

1 min
449

सोडूनी अंगण माहेरचे तूl

शोभा वाढवीशी सासरची ll

घेशील मिसळुनी स्वतःला तूl

बनून राहशील लाडाची ll

पण,वाटते तितके सोपेही नव्हेl

अनोळखींमध्ये वावरणेll

तू तुझ्यातच खास आहे गl

कारण नारी बनणे सोपे नव्हे ll १


9महिने ओझे वागण्या l

सहनशीलते सोबत बळ हवेll

जीव नवा एक जन्मा घालण्या l

आई विना सांगा कोण करे ll

उगीच नाही म्हणती सारे ll

आईतच सारे देव वसेl

तू तुझ्यातच खास आहे ग

कारण नारी बनणे सोपे नव्हे ll२


विश्वाची तू शक्ती खरी l

तू स्वतःला ओळखायला हवे ll

नको स्वतःला समजू अबला l

तूच तर खरी मर्दानी आहे ll

कित्तेक झाल्या अन पुन्हा होतील l

रूपे अनेक ही तुझीच असे ll

तू तुझ्यातच खास आहे गl

कारण नारी बनणे सोपे नव्हे ll३


Rate this content
Log in