STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Inspirational

3  

SANGRAM SALGAR

Inspirational

जर मलाही बहीण असती तर...

जर मलाही बहीण असती तर...

1 min
196

लहानपणी लागला असता तिचा लळा,

खरंच तिच्या मायेला नाही कोणाची सर,

मलाही मिळाला असता तिचा वेडा जिव्हाळा,

जर मलाही बहीण असती तर...

मलाही गोळ्या - बिस्किटांवरुन भांडता आलं असतं,

सतत कानी पडले असते तिचे स्वर,

कोणत्याही गोष्टींवरून मलाही रुसता-फुगता आलं असतं,

जर मलाही बहीण असती तर...

भावना व्यक्त करायला मिळालं असतं हक्काचं व्यासपीठ,

मदतीच्या वेळी माझ्यासाठी तिनं डोक्यावर घेतलं असतं घर,

माझ्यासाठी तीच बनली असती अनोखी ज्ञानपीठ,

जर मलाही बहीण असती तर...

मलाही बांधता आली असती राखी - प्रतीक प्रेमाचं,

ती असता राहिला नसता कशाचा डर,

एक अतुलनीय श्वासाचं नातं निर्माण झालं असतं,

जर मलाही बहीण असती तर...

वचन देऊन मीही तिला मनवलं असतं,

तिच्यारूपी संघर्षामध्ये पक्ष्यांसारखे मिळाले असते पर,

मलाही भाऊबीजेला तिची आवडती भेट देण्यासाठी तिनं भाग पाडलं असतं,

जर मलाही बहीण असती तर...

प्रत्येक सुख - दु:खात मलाही मिळाली असती साथ,

खरंच तिच्या प्रेमाला नसतो कोणता स्तर,

संधी मिळाली असती तिच्या संकटांवर करण्याची मात,

जर मलाही बहीण असती तर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational