जोगवा
जोगवा
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन ||धृ||
आई आहे जनता सारी भुखी
ठेव प्राणीमात्रांना तू सुखी
पाण्याविना अवनी झाली रुखी
घास प्रेमाचा घाल तू मुखी ||१||
आईचा जोगवा जोगवा मागेन
भेदभाव सारून दर्शनाला येईन
आमच्या माणुसकीच्या भावनेन
मन तृप्त तुझेच मग होईन ||२||
ज्ञानामृताची वाहिन मी परडी
देशद्रोहींची घोटून खरी नरडी
उठवू भारतमातातून त्यांची तिरडी
समतेची,ममतेची भरिन मी दुरडी ||३||
क्रांतीची पेटवून मशाल भारी
योध्दे तयारीशी जमून सारी
कोरोना विषाणू जमता दारी
लसीकरण करून हाकलून देवू स्वारी ||४||
ज्ञानाचा जोगवा जोगवा मागेन
दाही दिशांचा अभ्यास मी करेन
एकात्मतेचा ध्वज उंचच धरेन
मायेचे,प्रेमाचे,स्वाभिमानाचे जीवन जगेन||५||
ऐसा जोगवा अंबे मागून ठेविला
कार्य तत्परतेने मातेस फेडिला
फेरा तुझा कधी ना चुकविला
गोड नैवद्य मी तुज दाखविला ||६||
