जलदिन
जलदिन
'उन्हात राबणाऱ्या मजूराला
थंड पाणी अमृता समान वाटते
पाण्याची किमत नसलेल्याला
पाणी गरज वाटत नसते
दुष्काळातील माणसांचं जीवन
लाकडाच्या धपलीसारखे असते
तप्त उन्हाचा दाह सोसून
पाण्याचा थेंब वाचवत असते
आठ दिवस पाणी नसते
तेव्हा माणसांची चिंता वाढते
गुराढोरांचे तर हाल पाहून
धरणीलाही रडू कोसळते
तापलेला उष्ण उन्हाळा
ओढे,नाले,कोरडे पाडतो
मुक्या प्राण्यांचे, पाण्यासाठी
खरोखर हाल पहात असतो
मातीत राबनार्या माणसाला
खरी तहाण जाणवते
थंड पाणी त्याच्यासाठी
फार मोठी दौलत असते
चालणार्या नित्य पांथस्ताला
त्याचा कायम अनुभव असतो
जिथे ,जिथे मिळेल पाणी
त्याला आशीर्वाद देत जातो
पाणी नाही तर सृष्टी नाही
पाण्यासाठी माणूसकी दाखवा
तिथेच आहे सर्व चारीधाम
सेवा द्यावी सर्व मानवा
पाणी पाजा, जीव वाचवा
देशकार्याचा मंत्र वापरा
हीच शिकवण संतांची जपा
आयुष्यभर जतन करा
पाण्यासाठी नको भांडणे
नको आपसात मारामारी
सर्वांनी समान घ्यावे
दररोजची नको धराधरी
