जल हेच जीवन
जल हेच जीवन
पाणी पाणी महत्त्वाचे
पशू पक्षी संवर्धन
जाण सदा तू माणसा
त्यांचे करणे रक्षण.
पाण्यासाठी तळमळ
जीव वणवणतोय
कानी आक्रोश धरेचा
ऐकू सारखा येतोय.
उपयोग पाण्याचा तो
शेती उद्योग कामाला
केली कत्तल जंगले
आता मुकला पाण्याला.
थेंबे थेंबे तळे साचे
सदा लक्षात ठेवणे
मग तो असो कचरा
नको नदीत साठणे.
झाडे लावून जपावी
प्रदूषण थोपवावे
अनमोल आहे पाणी
सांभाळून वापरावे.
