जिवलगा
जिवलगा
अबोल शब्द क्षणात ओळखणारा
आवडतो तू मला
दुखावलेल्या जखमांना मलमपट्टी करणारा
आवडतो तू मला
हरवलेल्या गर्दीत शोधणारा
आवडतो तू मला
निर्जीव भावनांना सजीव करणारा
आवडतो तू मला
जग विरोधात असताना साथ देणारा
आवडतो तू मला
निस्वार्थ तुझं असं प्रेम
आवडतो रे तू मला

