STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy Inspirational

जिंदगी (गझल)

जिंदगी (गझल)

1 min
195

वादळाने गाजलेली जिंदगी

विस्तवाने पेटलेली जिंदगी 


मोगर्‍याची बाग होती साजरी

कंटकांनी व्यापलेली जिंदगी 


वस्त्र अंगावर मुलायम रेशमी 

वास्तवाने फाटलेली जिंदगी 


साजणीची भेट होती वादळी 

वीज पडता भंगलेली जिंदगी 


आत्महत्या का करावी राजसा

प्राक्तनाने लाभलेली जिंदगी 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy