STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

जीवनगाणे गातच रहावे

जीवनगाणे गातच रहावे

1 min
292

जीवनगाणे गातच रहावे

आल्या गेल्या सुखदुःखासवे 

पुढे पुढे चालत रहावे

जीवनगाणे गातच रहावे...!!


एकमेकांना देऊन साथ

माणुसकीचा पथ धरावे

तुझे माझे न म्हणताच

सारे एकदिलाने जगावे....!!


क्षणभंगुर या जीवनात

कोणी कोणा ना दुखवावे

प्रेमाने पुलकित होऊनी

ह्रदयस्थानी विराजमान व्हावे...!!


झाले गेले विसरून जावे

जीवनगाणे गातच रहावे

उषःकालच्या सुर्यंकिरणासम

स्वयंप्रकाशित व्हावे.....!!


नको माणसा गर्व करू रे

अनंतात विलिन व्हावे

काय भरवसा या जिवनाचा

मरावे परी किर्तीरूपी उरावे....!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational