STORYMIRROR

Archana Murugkar

Inspirational

3  

Archana Murugkar

Inspirational

यंत्रवत जीवन

यंत्रवत जीवन

1 min
237

वेडा बोलतो स्वप्नात 

पुन्हा एकदा मित्रांशी

खूप हसतो गप्पांत

झडतात हास्य राशी


सत्यात जाणतो मग

हरवले मागे सारे

जरी हजार कारणे

झाले भूतकाळ सारे


अहंकार आड येई

कधी स्तर समाजात

जरी सुदामा-श्रीकृष्ण

होते सारे पुराणात


वर्तमान गुंतलेला

असे कामाच्या घाईत

बंधनाच्या चाकोरीत

सहकारी मेळाव्यात


वेळ काढावा थोडासा

द्यावा दिलासा मनाला

यंत्रवत जीवनात

भेटा आपल्या जीवाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational