Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Romance Classics

3  

Shobha Wagle

Romance Classics

जीव माझा

जीव माझा

1 min
290


का जीव सांग माझा..भुलतो तुझ्यात आहे

रमतो तुझ्यात आहे..जगतो तुझ्यात आहे


संगत तुझी असावी, माझ्या मनास वाटे

हा भास होय माझा ..रमतो तुझ्यात आहे


आकाश आज सारे..भरले जणू ढगाने

जगण्यात सौख्य आता..बघतो तुझ्यात आहे


स्पर्धा अशी मनाची.. जिवनात आज वाटे

मागे वळून बघता..दिसतो तुझ्यात आहे


प्रेमात मी बुडालो..सांगू असे कुणाला

नाही कळे मनाला..मरतो तुझ्यात आहे


श्वासात तूच आहे, जगण्यात तूच आहे

आगीत आज जळुनी, उरतो तुझ्यात आहे


वेड्या नकोस तोडू , विश्वास जीवनाचा

मी जिंकलोय कारण, हरतो तुझ्यात आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance