झुळूक
झुळूक
उंच डोंगर माथ्यावर
पसरली धुक्याची झालर
शील घालते कडीकपारी
गुलाबी थंडीची मंद लहर
झाडा -पानावर विराजली
दवबिंदूची आरास सुंदर
शशी किरणात न्हावूनी
स्वरूप दाखवती मनोहर
दवात न्हाहलेली वसुंधरा
मृदा गंध पसरवी चराचरावर
शितल गारव्याची झुळूक
शहारे उठवते देहांगावर
आगमन हे हिवाळा ऋतूचे
पडसाद उमटे तनमनावर
सृष्टीस नवा अलंकार देत
साज दाखवी जनमनावर