झुकले अंबर
झुकले अंबर
**********************
सांज सकाळी
सागर *किनारी*
सहज पाहिले
त्या *क्षितिजावरी.*
मन वेडावले
पाहून *नजारा,*
तिथेच मिळते
धरणी *सागरा.*
तो विलोभनीय
निसर्ग *सोहळा,*
अंतरी दाटला
भावनेचा *मळा.*
क्षितिजावरती
झुकले *अंबर,*
आनंदात झुले
प्रेमाची *झालर.*
अलगद वारा
हळूच *शिरला,*
सागर किनारी
स्पर्शून *मनाला.*
सूर्य प्रतिबिंब
मनात *भरले,*
त्या रम्य किनारी
अंबर *झुकले.*
------------–-----------------