STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy

जगणे कठीण होते

जगणे कठीण होते

1 min
221

जगणे कठीण होते

बरेच भोगुन झाले 

खुप जगायचे होते

थोडे राहून गेले


नजरा बऱ्याच होत्या

जखमा देत होत्या

लक्तरे या देहाचे

कितीदा पाहुन झाले

विस्कटलेले आयुष्य

थोडे शिवायचे राहून गेले


किती हात होते

किती घात होते 

गर्दीतून स्पर्श

किती झेलून झाले

लज्जेला थोडे

झाकायचे राहून गेले


किती धावत होते

किती पहात होते

खेळ वासनेचा खेळून

किती वार केले

आक्रोशालाही थोडे

शांत करायचे राहून गेले


किती आकृत्या 

विकृत झाल्या

किती बळी गेल्या

मेणबत्तीचेही कितीदा 

वितळून झाले

निषेधाचेही थोडे 

निषेध करायचे राहून गेले


धाव जोरात होती पळवाट कुठेच नव्हती

वेदनेलाही ठार करून

शिल वेशीवर टाकून गेले

अमानुषतेलाही थोडे

समजावयाचे राहून गेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy