STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Tragedy

जगणे कळलेच नाही

जगणे कळलेच नाही

1 min
265

खर सांगु का

आयुष्यभर कष्ट केलीत

पण जगता आले नाही

मरमर राबत गेलो

पण जगणे कळले नाही


वेदना यातना दुःख भोगून

जिवाच रान केले 

सुख ही चार हात दुर राहीले


आता सरतेशेवटी

मरण जवळ आले

तेव्हा कुठे माणूस कळायला लागला

कधी मरतो म्हणून 

वाट पहायला लागला


काय जमापुंजी असेल ती

सांगून जा

असा रोज उपदेश देतात 

कागदपेन धरून रोजं जवळ बसतात


कोऱ्या कादावर सही करण्याचा

नातलगांचा आग्रह असतो

प्रेमापेक्षा मनात स्वार्थच जास्त दिसतो


अरे आपल्यासाठी काय करून ठेवल

याचा कोणी विचार करत नाही

पैसाशिवाय कोणीचं जवळचा वाटत नाही


प्रॉपर्टीवर डोळा ठेवून

खोटी काळजी घेतात

माणूस मेल्यावर

आपसात भांडतात


जे कमवतो ते पोरासोरांच्याच नावे टाकतो

स्वतःच बँकबलेन्स 

मात्र रिकामचं ठेवतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy