STORYMIRROR

Shakil Jafari

Tragedy

3  

Shakil Jafari

Tragedy

जाणीव गुलामीची

जाणीव गुलामीची

1 min
11.7K

माणूस खरं म्हणजे

स्वातंत्र्य आणि स्वेच्छेचे

स्वप्न बघत असतो..।

पण प्रत्यक्षात मात्र

स्वतःला गुलाम बनवून

पिंजऱ्यात कोंडून घेतो

डोळ्यांनी न दिसणाऱ्या

रीत, रिवाजांच्या बेडीत

स्वतःला जखडून...


मग ती गुलामी

शारीरिक असेल

किंवा मानसिक,

भौतिक असेल

किंवा आत्मिक...

मग ती गुलामी

इच्छा आकांक्षांची असेल

अर्थहीन अहंकाराची

किंवा

दुसऱ्या कुठल्याही रूपात

पण गुलामी गुलामीच असती...


कोणी म्हणेल कुठे आहे पिंजरे?

पण

प्रत्येक पिंजरा

नजरेनी दिसेलच असं नाही...

आज माणसाने न दिसणाऱ्या

पिंजऱ्यात स्वतः होऊन

स्वतःला कोंडून घेतलंय

धर्म, देश आणि संस्कृती सकट..।


आणि तडफडत आहे

पंख छाटलेल्या पक्षीसम...


विचित्र म्हणजे

त्याला जाणीवपण नाही

या गुलामीची...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy