जागतिक गणित दिन
जागतिक गणित दिन
गणित विषय
माझ्या आवडीचा
त्यासाठी काढते
वेळ सवडीचा ||
शिकविते मुलांना
दोन अधिक दोन
होतात बाबांनो चार
कंपासने मोजा कोन ||
वस्तू कमी करुनी
वजाबाकी करूया
साहित्य मोजूनी
बेरीज शिकूया ||
वर्गीकरणाची आहे
रीतच फार न्यारी
आकृतिबंधाची ही
ट्रिक आहे भारी ||
तयार करूया
पाढा अठराचा
पाठ शिकूया
गुणाकाराचा ||
तास मिनिटे काटा
नाही कधी विसरणार
असतात आठवड्यात
मोजा सातच वार||