हे विनायका
हे विनायका
आदी वंदना तू गणेशा
सर्व कलांचा तू नायका
दुरावती सारे विघ्ने आता
नाव तुझं घेता विनायका
मंगल मुरत रुप सुन्दर
शंका सांडी विणाधरा
सरस्वती ची ती विद्या
देई विद्येच्या नायका
नाद माधुर्य घुमती कानी
गणा वाजवी वीणा ती
मंत्र मुग्ध जाहली धरती
अंतरी जागली श्री मुर्ती
कलेस कला शिकवुनी
ज्याने केले विघ्ननाशन
तयाची आराधना मनी
नमन तुज हे गजवदन
