STORYMIRROR

Pandit Warade

Classics Inspirational Others

3  

Pandit Warade

Classics Inspirational Others

हा असा का धावतो?

हा असा का धावतो?

1 min
212

काय झाले माणसाला हा असा का धावतो?

धावणे जेथे जरुरी का तिथे मंदावतो?


बोलतो कोणा कधी का एक शब्द चांगला

झोड निंदेची उठवण्या का पुढे सरसावतो?


माय बापाची थोरवी गौरवाने सांगतो

शेवटी सांभाळ करण्या, वृद्धाश्रमी धाडतो


आपुल्या नात्यातल्यांचा द्वेष करतो नेहमी

स्वार्थ साधण्यास मात्र खोटे अश्रू ढाळतो


कोरडा झाला कसा हा लाजतो पाषाणही

माणसाच्या आत जैसा लोपला सैतान तो


माणसाच्या मूळरूपी माकडे ही लाजती

ती बरी ऐशा परी माणूस आजचा वागतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics