गुलाबी उषःकाल
गुलाबी उषःकाल
गुलाबी उषःकाल,स्वप्नं खजिना घेऊनि.
पापणीच्या तिजोरी, बंद स्वर्ग ठेवूनि.
अंगणी सोनेरी किरणांची सडे पिंजूनी.
फुलांच्या बेधुंद सुगंधात मोहरूनी.
तुझ्या माझ्या मनी उठे प्रीत हूरहूर.
भेटीस ती सदा होत, बैचैन आतुर.
कधी सरली काळरात्र स्वप्नात चूर.
गुलाबी उषःकाल काळजात मोहर.
अनोळखी दोघे नजर चोरटी भेट.
चहा,कांदेपोहे देत,थरथरत हात.
शृंगार घामाघुम स्पर्शगंध दरवळत.
गुलाबी उषःकाल फुलवी संसार रीत.
अनमोल आठवणी गुलाबी उषःकाल.
स्वप्नझेप पूर्तीस शेज ती मखमल.
उधळे दाही दिशा सप्तरंगी ओंजळ.
नवचैतन्याने बहरलेली प्रीत अबोल

