STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance

4  

Sanjana Kamat

Romance

गुलाबी उषःकाल,

गुलाबी उषःकाल,

1 min
240

गुलाबी उषःकाल,स्वप्नांचा खजिना घेऊनी.

पापणीच्या तिजोरी, बंद स्वर्ग ठेवूनी.

मनाच्या अंगणी सोनेरी किरणांची सडे पिंजूनी.

फुलांच्या बेधुंद सुगंधात आले मोहरूनी.


तुझ्या माझ्या मनात उठे प्रीतीची हूरहूर.

भेटीस तुझ्या सदा होत, बेचैन आतुर.

कधी सरली काळरात्र स्वप्नात मी चूर.

गुलाबी उषःकालाचा काळजात मोहर.


अनोळखी दोघे नजर चोरटी घेत भेट.

चहा,कांदेपोहे देत, थरथरत होते हात.

लाजून शृंगार स्पर्श गंध दरवळत.

गुलाबी उषःकाल फुलवित संसाराची रीत.


अनमोल आठवणीत सजली गुलाबी उषःकाल.

स्वप्नझेप पुर्तीस नटली शेज मखमल.

उधळीत दाही दिशा सप्तरंगाची ओंजळ.

नवचैतन्याने बहरली प्रीत ती अबोल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance