गरजेचं आहे ....
गरजेचं आहे ....
तुझं शिकणं गरजेचं आहे ...
आपला समाज,
पुरुषप्रधान असण्यापेक्षा मनुष्यप्रधान होणं,
गरजेचं आहे ...
आपल्या घरात,
जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा "लक्षुमी आली"
असं म्हणण्यापेक्षा "सरस्वती-शारदा आली" असं म्हणणं
गरजेचं आहे ...
आपल्या समाजात,
जर पुन्हा आनंदीबाईंसारखी डॉक्टर,
सावित्रीबाईंसारखी शिक्षिका आणि
रमाबाईंसारखी समाजसुधारक होणं ,
अपेक्षित आहे तर,
गोपाळराव ,ज्योतिबा फुले आणि न्यायाधीश महादेव रानडे अश्या थोर व्यक्तिमत्वांच्या दृष्टिकोनातुन विचार करणं ,
गरजेचं आहे ...
तुझं शिकणं गरजेचं आहे ...
