मैत्रीण नाही प्रेयसी
मैत्रीण नाही प्रेयसी
मैत्रीण नाही नाही, " प्रेयसी "
सगळे नाही तरी म्हणतातचं,
"ती "... ती थोडी ना तुझी मैत्रीण आहे...
प्रेयसीचं वाटते... अ रे, वाटते कसली आहेच ती तुझी प्रेयसी...
उगाच का मग तुझं नाव घेतल्यावर हसू येत तिच्या चेहऱ्यावर..
तुझा विषय निघाला काय आणि जरा तुझी निंदा केली काय..
आमच्या प्रत्येक शब्दाला तिच्याकडे उत्तर असतं...
एवढंच काय तुझ्या हातावर चहा काय सांडला ...
स्वतःचा रुमाल देणारी ती एकटीच..
आता यात मुलींना स्वतःचा रुमाल किती खासगी असतो हे सांगायची गरज नाही..
ती म्हणत नसेल रे काही..
पण तुम्हाला चिडवलं ना.. तर हळूच लाजते ती..
तिला कल्पना असतेचं आम्ही तुला तिच्या नावाने चिडवतो याची..
तू नाही आलास न शाळेत मग आम्ही गंमत बघायचो..
बिचारी दिवसभर एकटीच बाकावर बसून असायची..
तुझा डबा आम्ही लपवायचो खरं.. पण हे माहित असून सुद्धा स्वतःचा डबा तुला द्यायची ती..
आता कधी भेटलीच समजा..
तर सांगून टाक कि मनातलं तिला..
आमचं काही नाही रे मित्रा..
इच्छा फक्त हीच आहे..
पुढे जाऊन तू म्हणू नयेस ...
"ती सध्या काय करते..."

