गोपाळकाला
गोपाळकाला




जमून बाळ-गोपाळांचा मेळा
भर भर जमले सवंगडी
दह्या-दुधाने भरली ही मटकी
थर लावून चला फोडू ही हंडी।।1।।
आनंद गगनात मावेना
हर्ष मनी हा मावेना
जागवू ही रात्र जन्माची
दहीहंडी फोडून दही भात खावून।।2।।
पावन अशा भगवंताची
श्याम सख्या मुरलीची
राधेच्या त्या कान्हाची
दहीहंडी फोडू गोपाळकाल्याची।।3।।