Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neeraj Shelke

Romance

3  

Neeraj Shelke

Romance

गोडवा तुझ्या सोबतीचा

गोडवा तुझ्या सोबतीचा

1 min
245


गोडवा तुझ्या सोबतीचा 

मला आयुष्यभर पुरेल , 

तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात 

तूच सांग सखे काय उरेल !!


तू आहेस सोबत म्हणून 

माझ्या जीवनाला अर्थ आहे , 

तुझ्याशिवाय हे जगणं म्हणजे 

नुसतंच गं व्यर्थ आहे !!


तू जर नसली सोबत 

तर दिवस माझा जात नाही , 

तुझ्याशिवाय सखे मी 

पाणी काय जेवणही खात नाही !!


इतकं आहे तुझं-माझं प्रेम की 

देवालाही वाटेल हेवा , 

अन् तुझ्या प्रेमाखातर 

तोही करेल तुझी सेवा !!


तुला देतो शपथ सखे मी 

तुझी सोडणार नाही साथ , 

कारण तुझ्याचसोबत चालायची आहे 

मला माझ्या सुंदर आयुष्याची वाट !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance