गमवून हे समजलं...
गमवून हे समजलं...
गमवून हे समजलं, त्यामुळे आयुष्य उमजलं,
जीवन तसं सजलं, काेडं समस्येचे उललं...
गमवून हे समजलं, आयुष्य तराजूत ताेललं,
नाकत्याॆंना बाजूला काेललं, सत्यच वदवून घेतलं...
गमवून हे समजलं, माझे काेण हे मला कळलं,
वळणाचंच पाणी अडवलं, समस्येचे निवारण झालं...
हे सर्व डाेक्यानेच केलं, गमवून हे समजलं,
पाणी न देता झाड वाळलं, सत्य कसं बघा धावलं...
