Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shrutika Daud

Abstract Classics Others

3  

Shrutika Daud

Abstract Classics Others

गझल शेती गहाण ठेवू

गझल शेती गहाण ठेवू

1 min
199


आनंदकंद..... गागाल गालगागा×2


मैत्रीस जागण्याला, हृदयी इमान ठेवू!!

नजरेत आज मित्रा, मोठे सपान ठेवू!!


आलाच जर कधीही,दारी कधी भुकेला,

त्याच्यासवे पिलांच्या, हातात धान ठेवू!!


देशात पेटलेला, दावाग्न फार मोठा,

हा देश वाचवाया, उजवे तुफान ठेवू!!


इंग्लंड अमेरिकाही,लाजेल फ्रांस रशिया,

विश्वात देश भारत, इतका महान ठेवू!!


ज्ञाना,तुका,कबीरा,गांधी सुभाष अब्दुल,

बाबा,तथागतांची, हृदयात जान ठेवू!!


येतील पाखरे अन्,गातील गोड गाणी,

आता जनावरांना, हिरवेच रान ठेवू!!


प्रेमात वागण्याचा,माझा स्वभाव सुटला,

आता बरोबरीचे, स्वार्थी निशाण ठेवू!!


व्याजासहीत मुद्दल, देवू हिशोब सारा,

घरदार, मालमत्ता, शेती गहाण ठेवू!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract